गेट टुगेदर -School Get Together
नमस्कार माझ्या शाळकरी मित्रानो, गेट टुगेदर हा शब्द जरी कानी पडला तरी माझ्या तल्लख मेंदूला एकाच माणसाची आठवण येते तो म्हणजे श्रीयुत अरुण पवार, आमच्या अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर शाळेच्या १९९३-९४ बॅच च्या गेट टुगेदर चा कर्ता-धर्ता व सर्वांकडून करविता असे सर्व काही, तर ह्या पवार साहेबांचा मेसेज आला आपल्या आत्ता झालेल्या चवथ्या गेट टुगेदर विषयी लिह, मी म्हटले मी काय लिहणार, आपली धाव आपल्या ओळखीच्या मित्र परिवाराचे वाढदिवसाचे पानभर मनोरंजक शुभेच्छा पत्र लिहण्या पर्यंतच, इतके कसे लिहणार? तरी म्हटले सुरवात तर करूया, मग पुढचे पुढे..... सुरवात तर अरुण पासूनच होणार, तर हा आमचा अरुण अभ्यासात हुशार (अ वर्गात कार्पेन्टर घेतल्याने गेला असणार नक्की) नसला तरी, जनसंपर्क दांडगा, आणि सर्वाना हवाहवासा वाटणारा, तसे पहिले तर हा माणूस आणि मनीष पी. मला शाळेत असलेले अजिबात खरंच आठवत नाही, तसे मीच दहावी नंतर विरार सोडले पण आता ओळख झाल्यानंतर माणूस ठीक वाटला, दिसतो तितका .... नाही असो .... ! मुळात अरुण ने व्हाट्सअँप ग्रुप बनवला किलबिल ग्रुप च्या किलबिला...